धार्मिकमहत्वाचेमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला सहकुटुंब बाप्पाला निरोप


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दहा दिवसापासून बाप्पा विराजमान झाले होते. आज अनंत चतुर्दशी निमित्त सागर बंगल्यावरी बाप्पांचे आज विसर्जन करण्यात आले.



पर्यावणाला हानी पोहचु नये म्हणून या गणपतींचे महानगरपालिकेच्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. यावेळी अमृता फडणवीस देखील त्याच्यासोबत होत्या. ‘सागर’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बाप्पाना निरोप दिला. याचे फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

यावेळी ‘गणरायाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले’ अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यासोबतच ‘बाप्पाचा आशीर्वाद सदैव सोबत असेल याच विश्वासाने पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू’ असेही ते म्हणाले.

‘सागर’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी आज लाडक्या गणरायाचे कुटुंबीयांसोबत, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले.

महत्वाचे

निरागस बालक राघव ढगे बीड गणेशाला वंदन करताना दिसत आहे

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button