क्राईमताज्या बातम्या

विषारी द्रव पाजून व तरुणाला बेदम मारहाण करीत जुन्या वादातून खून करण्यात आल्याची घटना


जळगाव:जळगावातील विषारी द्रव पाजून व तरुणाला बेदम मारहाण करीत जुन्या वादातून खून करण्यात आल्याची घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत रविवार, 11 रोजी घडली.
या प्रकरणी चौघांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जळगाव एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत चेतन प्रकाश चौधरी (23, रामेश्वर कॉलनी, जळगाव) या युवकाचा मृत्यू झाला.



चेतन चौधरी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू होते मात्र त्याचे गल्लीतील मुलांशी अधून-मधून वादही होत होते. रविवारी दुपारी चार वाजता चेतनला गल्लीतील चार तरुणांनी जुन्या वादातून बेदम मारहाण केल्याने तो गल्लीत पडल्याची माहिती त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी धाव घेत मुलाला जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र रात्री साडेआठ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी प्रकाश रघुनाथ चौधरी (62, प्रियंका किराणा शेजारी, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसात मंगळवारी दिल्यानंतर संशयित सचिन कैलास चव्हाण, सोन्या उर्फ तुषार जाधव, सनी जाधव उर्फ फौजी व कुंदन पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक जगदाडे, उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, चालक ईम्तियाज खान आदींनी आरोपींच्या मुसक्या बांधल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button