जम्मू काश्मीर येथे थंड हवेत येणारी सफरचंद भोरच्या काळ्या मातीत
तरुणाने फुलवली सफरचंदाची शेती
भोर : हिमालयात पिकणारी सफरचंदाची शेती भोरमधील एका तरुण शेतकऱ्याने भोरच्या काळ्या मातीत सफरचंदांची लागवड करून ती जोपासून सफरचंदाच्या झाडांना फळे आल्यामुळे सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहभोर शहरातील भोरदरा डोंगराजवळील वाघजाई मंदिर परिसरातील जागेत उष्ण वातावरणात आणि काळ्या मातीत सफरचंदाची रोपे लावून यशस्वी प्रयोग भोरमधील संदीप (बाबू) शेटे या तरुण हौशी शेतकऱ्याने केला आहे.
दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातील सिमला येथून हार्मोन 99 या सफरचंदाचे वर्णाचे 15 रोपांची 15 बाय 15 फुटाच्या अंतरावर या रोपांची लागवड केली असून, सेंद्रिय खतांचा वापर करून झाडांची जोपासना केली असल्याने सर्व झाडांना ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी दिले जात आहे. झाडे लावल्यानंतर एक वर्षातच त्याला फुले लागण्यास सुरुवात झाली होती; पण सुरुवातीचा बहर न घेता अजून एक वर्ष जाऊन दिले दुसऱ्या वर्षी झाडाची उंची साधारणता सात ते आठ फूट झाली त्यानंतर जो फुलांचा बहर आला त्यावेळी फळे घेण्यास सुरुवात केली आहे. एक रोप 750 रुपये आणि इतर खर्च धरून 25 हजार रुपये खर्च झाला आहे.
दरम्यान दोन वर्षानंतर झाडांना चांगल्या प्रकारची सफरचंद लागलेली असून सफरचंदाची बाग आता बहरली आहे. झाडांची ही पूर्ण वाढ झाली असून साधारण या झाडांना वर्षे भरात दोनशे तास थंडी लागते आणि ती मागील वर्षी चांगल्या प्रकारे मिळाल्याने झाडांची पूर्ण वाढ होऊन योग्य देखभाल केल्याने यंदा उत्तम प्रकारे सफरचंद लागली आहेत. एका झाडाला 30 ते 40 सफरचंद लागली आहेत.
हिमालयातील हिमाचलप्रदेश जम्मू काश्मीर येथे थंड हवेत येणारी सफरचंद भोरच्या काळ्या मातीतही बहरू शकतात, हे या प्रयोगातून सिद्ध झाले असल्यामुळे पुढील वर्षी तीन एकरात सफरचंदाची झाडांची लागवड करणार आहे.
हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !