बीड कुत्रा अंगावर भुंकला म्हणून बंदुकीने गोळी घालत कुत्रा केला ठार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बीड : कुत्रा अंगावर भुंकला म्हणून बंदुकीने गोळी घालत कुत्र्याला ठार मारण्यात आलं. ही चीड आणणारी घटना बीड  जिल्ह्यातील परळी ( Parali ) तालुक्यात घडली.
परळीतील धर्मापुरी फाटा येथे असलेल्या एका हॉटेलच्या आवारातील कुत्र्यावर संतापलेल्या इसमाने गोळीबार केला आणि त्याचा जीव घेतला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस (Parali Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

धर्मापुरी फाटा इथं विकास बनसोडे यांचं हॉटेल वीर बिअर बार आहे. याच ठिकाणी त्यांनी काही कुत्रे देखरेख करण्यासाठी पाळले होते. या बिअर बारमधील एक कुत्रा भुंकला म्हणून त्याची हत्या करण्यात आली.

अंगावर भुंकला म्हणून थेट कुत्र्याला गोळ्या घालून ठार मारलं, बीड जिल्ह्यातील परळी येथील एका बारमधील चीड आणणारी संतापजनक घटना #Beed #CCTV #Paraliकुत्र्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडणारा व्यक्ती रामराज घोळवे असल्याचं समोर आलं आहे. रामराज घोळवे हे माजी कृषी अधिकारी असल्याचंही समजतंय. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन कुत्रे बाहेर एका व्यक्तीवर भुंकत जात असल्याचं दिसतंय. तर एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन रस्त्यावरुन हॉटेलच्या गेटच्या दिशेने आत येताना दिसली आहे. त्यानंतर एके ठिकाणी ही व्यक्ती हॉटेलमध्ये आतपर्यंत जाते.

कुत्र्यांच्या मागे हॉटेलच्या मागेपर्यंत गेलेली ही व्यक्ती नंतर बाहेर हातात बंदुक घेऊन आल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालंय. यावेळी आणखी एक व्यक्तीही तिथे असल्याचं दिसलंय.

सध्या परळी ग्रामीण पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास करत आहेत. विकास बनसोडे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई सुरु आहे. मात्र कुत्र्यांची निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केल्यानं प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !