7.1 C
New York
Saturday, December 9, 2023

Buy now

पुणे नवऱ्याच्या प्रमोशनसाठी बाससोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले त्यासाठी..

spot_img

पुणे : ( आशोक कुंभार ) नवऱ्याच्या प्रमोशनसाठी त्याच्या बाससोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यासाठी विरोध केल्यावर बेदम मारहाण करण्यात आली.

परंतु घर तुटू नये म्हणून मारहाण व अत्याचार सहन करत राहिले. आपल्या 12 वर्षांच्या मुलीसाठी हे सर्व आपण मूकपणे सहन केले, असे महिने केलेल्या तक्रारीत म्हटलंय. हा प्रकार सासऱ्यांना सांगितला. परंतु त्यांनीही ऐकले नाही. यामुळे शेवटी महिना न्यायालयात पोहचली. न्यायालयाने महिला व बालविकास आयोगाला चौकशीचे आदेश दिले.

नंदनगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा अमित छाबरा याच्याशी २००३ मध्ये विवाह झाला होता. अमित कपड्यांच्या शोरूममध्ये विक्रीचे काम करतो. दोघांना १२ वर्षांची मुलगी आहे. पतीचा पगार महिन्याला १० हजार रुपये आहे. त्याला पगारात वाढ हवी होती आणि म्हणून त्याला प्रमोशन हवे होते.

अमित पत्तीला माझ्या बॉसशी संबंध ठेवावे लागतील, असे वारंवार सांगत होता. महिलेने नकार दिल्यावर त्याने मारहाण सुरु केली. अनेकदा दबाब आणला.त्याने धमकीही दिली. पण महिलेने कधीच हो म्हटलं नाही. कुटुंबाला वाचवण्यासाठी महिला शांतपणे त्रास सहन करत होती.

पतीचा हा प्रकार मी ऐकत नसल्यामुळे देवर राजनेही त्या महिलेसबोत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली, असा कथित आरोप तक्रारीत केला आहे. हा प्रकार सासू हेमलता यांना सांगितल्यावर त्यांनीही पती आणि दिराला विरोध केला नाही. त्या दोघांना समजावण्याऐवजी सासूकडूनही मारहाण होत होती

सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने हाताची नस कापली. मात्र उपचार होईपर्यंत सासरचे लोक गप्प राहिले. यानंतर त्याने पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली. पती, दिर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून महिला १२ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे येथून इंदूरला आली. काही दिवसांनी पती अमित हा देखील इंदूरला आला आणि सर्वांसमोर मारहाण केली. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles