सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दिल्ली | केंद्र सरकरानं एक मोठी घोषणा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees) होळीपूर्वीच आनंदाची बातमी मिळणार आहे. यामध्ये पेन्शर्स आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वी शासन दरबारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळलं आहे.

या सातव्या आयोगाचं वेतन जाहीर झाल्यानंतर आता आठवा वेतन आयोग  स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. ही वाढ 44 टक्क्यांनी होण्याची शक्यता आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये  वाढ करण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार 18,000 वरुन 26,000 होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.57 टक्क्यांवरुन 3.68 टक्के वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं हा निर्णय घेतलं असल्याचं सांगितल आहे. हा आठवा वेतन आयोग सरकारकडून लवकरच गठित केला जाण्याची शक्यता आहे. याची अंमलबजावणी (Implementation) 2026 पासून केली जाऊ शकते. दरम्यान, या आठवा वेतन आयोगामुळं कर्मचाऱ्यांना पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे.