सात लाख रूपयांची लाच घेताना टोल अधिकारी जाळ्यात, धुळ्यात लाचलुचपत विभागाची कारवाई

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सात लाख रुपयांची लाच घेताला टोल अधिकारी एसीबीच्या जाळ्यातअडकला आहे. हरिष सत्यवली असे लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सत्यवली हा इरकॉन सोमा टोल कंपनीचा फायनान्स अधिकारी आहे.
इरकॉन सोमा टोलवे प्रा.लि. कंपनी दिल्ली यांच्या अथोरिटीतील महामार्ग क्रमांक तीन मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाक्याच्या देखभाल दुरुस्तीचा करार केला आहे. या टोलनाक्याची जानेवारी 2023 पर्यंतची थकीत रक्कम व धुळे जिल्ह्यातील लळिंग टोलनाका व्यवस्थापनाचा ठेका मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे स्वत:साठी दोन लाख रूपये आणि इरकॉन सोमा टोलवे कंपनीच्या संचालकासाठी पाच लाख असे तब्बल 7 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही लाचेची रक्कम घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने हरिष सत्यवली याला रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांनी कोअर असोसिएटस कंपनीचे चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापना बद्दलचे डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 चे रिअँम्बर्समेंन्ट रक्कम अदा करण्यासाठी व कोरल असोसिएटसने धुळे लळींग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी निवीदा भरली होती. ही निवीदा मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 19 फेब्रुवारी रोजी धुळे लळींग इरकॉन सोमा टोलवेचे फायन्नन्स अधिकारी हरिष सत्यवली यांनी स्वत:साठी दोन लाख आणि इरकॉन सोमा टोल व प्रा.ली. नवी दिल्लीचे संचालक प्रदीप कटियार यांच्यासाठी पाच लाख रूपये अशी एकूण सात लाख रुपयांची मागणी केली होती.

इरकॉन सोमा टोलवे प्रा.लि. कंपनी अधिकाऱ्यांनी केलेल्या या मागणीनुसार तक्रारदाराने 21 फेब्रुवारी रोजी धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खारजमा करून लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि हरिष सत्यवली हे लाचेची रक्कम घेतना त्यांना रंगेहाथ पकडले.

लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर कंपनीचा संचालक प्रदीप कटियार आणि धुळे टोलवेचे फायनान्स अधिकारी हरिष सत्यवली या दोघांवर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालक प्रदीप कटारिया याला ताब्यात घेण्यासाठी एसीबीचे पथक दिल्ली येथे रवाना केले असल्याची अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल बडगुजर यांनी दिली. दरम्यान, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याचेही लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल बडगुजर यांनी सांगितले.