छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था संचलित गुरुवर्य स्टार किड्स व गुरुवर्य कोचिंग क्लासेस च्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
माणसाने ध्येय आपले विचार आपली ताकद आपले कर्तव्य हे विचारात घेऊन काम केले पाहिजे हे शिकवण माननीय श्री पंकज कुमावत सरांनी आठवण करून दिली यात स्पर्धा परीक्षांचे ज्ञान व इतर काही गोष्टींचे ज्ञान सरांनी दिले शशिकांत गव्हाणे सर यांनी आपल्या महाराजांचे सर्व जुन्या आठवणींची उजळा दिला यावेळी त्यांनी महाराजांची कर्तव्य सर्वांसमोर मांडली यावेळी कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित होते यात जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे साहेब, युवराज दादा काळे, अंजलीताई घाडगे, गोपाळघरे सर,भैय्यासाहेब देशमुख,विनोद गुंड, सोमनाथ गुंड मनोज कदम, तिडके सर,अशोक लोंढे,अरविंद थोरात,सिद्धू खतीब,डॉ निखिल भालेराव, सौ मीनल साने,भागवत चौरे यांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित केले तसेच शिष्यवृत्ती सराव परीक्षेत प्रथम क्रमांक हरीओम गिरी, संस्कृती मोरे, द्वितीय क्रमांक आरती चाटे, तृतीय क्रमांक जगदीश घुले, यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले यावेळी आभार प्रदर्शन बोबडे सर सूत्रसंचालन दीप्ती बोबडे,अनुष्का वाळके यांनी केले