कानळद येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कानळद येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

कानळद येथे शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती व शिवजन्मोत्सव जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती निमित्त गावात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच गणेश जाधव यांच्या हस्ते सपत्नीक शिवरायांची पूजा करण्यात आली. आरतीसाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धोकरट साहेब व पोलीस हवालदार मुरडनर दादा उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री संपत लक्ष्मण जाधव यांनी भूषवले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व नृत्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेसाठी उत्कृष्ट प्रकारच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिवाजी महाराजांची भूमिका वेदांत किरण जाधव याने साकारली तर राजमाता जिजाऊ यांची भूमिका पूनम संपत जाधव हिने साकारली.

याप्रसंगी गावातील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये हिरहिरीने भाग घेत
उत्कृष्ट असे वकृत्व, निबंध व नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी गावातून सर्व स्तरातून नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत कार्यक्रमाला सुरेख साथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिंदे सर यांनी केले तर अहिरे सर यांनी अधिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून कानिफनाथ जाधव, प्रकाश जाधव व अतुल पारखे यांनी जबाबदारी पार पाडली.
बक्षीस वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.