ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

दिवंगत स्व.लक्ष्मणभाऊनीं पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी श्रीमती अश्विनीताई जगताप यांना बहुमताने विजय करा – पांडुरंग आवारे-पाटील


दिवंगत स्व.लक्ष्मणभाऊनीं पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी श्रीमती अश्विनीताई जगताप यांना बहुमताने विजय करा – पांडुरंग आवारे-पाटील
————————————————
पुणे : चिंचवड  ( आशोक कुंभार ) भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई(आ), शिवसंग्राम संघटना , रयत क्रांती संघटना महायुतीच्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी च्या उमेदवार सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथे काॅरनर बैठक व सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित उमेदवार सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, पिं.चिं.म.पा.मा.उप महापौर सौ.झामाताई बारणे,मा.नगरसेवक श्री.सिद्धेश्वर दादा बारणे,अमोल थोरात,काळुराम बारणे,जयदीप माने,योगेश बारणे,करिश्मा बारणे यांच्यासह या भागातील रहिवासी प्रतिष्ठित नागरिक,तरूण सहकारी व महायुतीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर.मा.पांडुरंग आवारे-पाटील यांनी या भागातील मान्यवर आणि नागरिकांशी भेटी संवाद साधला व सभेला संबोधीत करत आसताना पिंपरी-चिंचवड शहरातील व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी सकारात्मक दुरद्रष्ठी ठेवून दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केलेल्या विकास कामाचा
उल्लेख करून पिंपरी-चिंचवड शहराचे विकासाचे शिल्पकार चिंचवड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार. स्व.लक्ष्मण भाऊ जगताप यांना व मराठा समाजातील गौर गरीब कुंटूबातील लोकांना मराठा आरक्षण मिळावे म्हणून मुंबई येथील मराठा समाजाच्या मिटींग ला जात आसतांना अपघाती निधन झालेले-मराठा समाजासाठी बलिदान देणारे राज्यातील बहुजन समाजाचे लोकनेते,शिवसंग्राम संस्थापक स्व.आ.विनायकरावजी मेटे साहेब या दोन्ही महामानवांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून दिवंगत लक्ष्मणभाऊनीं पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी व आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार श्रीमती.अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांना विजयी करावे असे आवाहन चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदार व बंधू भगिनींना यावेळी शिवसंग्राम चे पांडुरंग आवारे-पाटील यांनी केले …!




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button