वैचारिक शिवजयंती साजरी करा;लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयात “शिवाजी कोण होता? शहीद गोविंद पानसरे लिखित पुस्तक वाटप

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वैचारिक शिवजयंती साजरी करा;लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयात “शिवाजी कोण होता? शहीद गोविंद पानसरे लिखित पुस्तक वाटप

बीड : छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती नाचुन नव्हे तर वाचुन वैचारिक साजरी करण्यात यावी असे आवाहन करत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांना शहीद गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता? ” या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन सावंत, पर्यवेक्षक अंगद हावळे, सहशिक्षक मुकुंद मोटे, गणेश आजबे, प्रल्हाद वाघे, रामहरी दाभाडे, विजय डोंगरे, राहुल रसाळ, शहाजी भोसले तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष विक्रांत वाणी व पदाधिकारी उपस्थित होते.

शिवरायांची आरती हे षडयंत्रच खरा ईतिहास समाजापुढे आला पाहिजे
__
छत्रपती शिवाजीमहाराज यांची समाधी महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८७० साली शोधून काढून त्यावरती पानफुले वाहत पहिला पोवाडा लिहून प्रथम शिवजयंती साजरी केली मात्र महात्मा फुले यांचे नाव शिवजन्मोत्सव निमित्त घेण्याचं आवर्जून टाळलं जाते.
याच बरोबर छत्रपती शिवाजीमहाराज यांची लग्न समारंभात आरती करून त्यांना देवत्व बहाल करून त्यांचा पराक्रम झाकोळण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक षडयंत्र रचुन केला जात असून त्याचा विरोध करायला हवा.

शहीद गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना शिक्षा कधी??
___
महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत काॅ.गोविंद पानसरे यांची ८ वर्षापुर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली, त्यातील आरोपींना अद्याप गुन्हेगार म्हणून सरकार घोषित करण्यात अपयशी ठरत असून त्यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ ईतिहास ” शिवाजी कोण होता?” या पुस्तकातून मांडणा-या शहीद गोविंद पानसरे यांचे विचार अजरामर राहणार आहेत. माणुस मारल्याने विचार मरणार नाहीत.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२