चौसाळा येथे होणार पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम-गणेश गुंजाळ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जाणता राजा छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पाच दिवसीय चौसाळा मोहत्सव पोस्टर चे ह.भ.प.रंधवे बापु यांच्या हस्ते अनावरण

चौसाळा येथे होणार पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम-गणेश गुंजाळ

(चौसाळा प्रतिनिधी–)
चौसाळा शहरात मागील १४ वर्षांपासून चौसाळा मोहत्सवा चे आयोजन केले जाते.राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील असंख्य कलाकार भाग घेतात. चौसाळा मोहत्सवाच्या पोस्टरचे अनावरण ह.भ.प.रंधवे बापु यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.यावेळी चौसाळा महोत्सवाचे सांस्कृतिक प्रमुख नामदेव कळसकर,भवानी ग्रुप चे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सचिव अज्जू भाई मुजावर, अजमेर मणियार,ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, नगरसेवक राजू जाधव,शहादेव जोगदंड पञकार अजमेर मनियार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.दिनांक १७ ते फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १७ रोजी शिवशाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक१८ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे , महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते मोनिका काळे यांचे व्यख्यान होणार आहे , दिनांक १९ फेब्रुवारी रोजी चौसाळा शहरातुन भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण लेझीम पथक,झांज पथक,वेशभूषा स्पर्धा असे आहे . दिनांक २० फेब्रुवारी व २१ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलया आहेत तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान जाणता राजा शिव छञपती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश गुंजाळ ,उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सचिव अज्जू मुजावर, कोषाध्यक्ष अमोल कांबळे, मार्गदर्शक बापू पवार उपसरपंच अंकुश कळासे,विजयराजे शिंदे,शहादेव जोगदंड, चौसाळा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष एन.टी.वाघमारे, मुस्तफा पठाण,अजमेर मणियार, जेष्ठ मार्गदर्शक बळीराम राऊत, मिराज मुलाने, विवेक कुचेकर, सुधीर चौधरी,अनवर कुरेशी, विकास सर्वज्ञ,मोसीन पठाण,प्रकाश व्यवहारे यांनी केले आहे.