लोकशाही कोणासाठी? सामान्यांना न्याय मिळेल कधी?२० फेब्रुवारी पासुन आझाद मैदान उपोषण,कोणी दखल घेईल काय?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


लोकशाही कोणासाठी? सामान्यांना न्याय मिळेल कधी?२० फेब्रुवारी पासुन आझाद मैदान उपोषण कोणी दखल घेईल काय?

पुणे : आशोक कुंभार गेल्या चार वर्षांपासून फरफट पुणे एसटी विभागाची रखडलेली भरती सुरू करण्यासाठी पात्र उमेदवार आता आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहेत. २० फेब्रुवारीपासून हे उपोषण सुरू होणार आहे.

यासंदर्भात विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांना पत्रदेखील देण्यात आले आहे. एसटी महामंडळाने २०१९ सरळ सेवा भरती (दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी काढली होती.) यामध्ये १२ विभागांची ४ हजार ४१६ जागांची चालक आणि वाहक पदाची जाहिरात निघाली होती. यासाठी पुणे विभागाने आधी लेखी परीक्षा घेतली.

कागदपत्रे छाननी झाली व मेडिकल झाले. त्यामधून २ हजार ९८२ मुलांना १७ जानेवारी २०२० पासून भोसरी येथे वाहन चाचणीसाठी बोलवण्यात आले. पण, यातील २३०० मुलांची चाचणी झाल्यावर २५ फेब्रुवारी २०२० रोजी भोसरी येथील ट्रॅक बंद पडला व तेव्हापासून हा ट्रॅक बंदच आहे.

या भरतीमधील मुलांनी सतत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्यासह एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली; पण एसटी महामंडळाने यावर आजपर्यंत अंतिम निवड यादी जाहीर करा पुणे विभागातील राहिलेल्या मुलांच्या ट्रायल तत्काळ घेऊन ? हजार ६४७ जागांची अंतिम निवड यादी जाहीर करावी.

राहिलेल्या मुलांच्या ट्रायल पूर्ण करून भरती प्रक्रिया पूर्ण करा. मुलांच्या अंतिम निवड याद्या जाहीर करून तत्काळ प्रशिक्षण सुरु करावे. प्रशिक्षण सुरु करताना जास्तीत जास्त गाड्यांची व्यवस्था करावी; जेणेकरून मुलांची तीन वर्षे भरून निघतील

या प्रमुख मागण्यांसह पुणे विभागातील मुले आझाद मैदानावर जमा होणार आहेत. कोणताही निर्णय घेतलेला नाही. या पात्र मुलांचे वय निघून जात आहे. नोकरी नसल्याने अनेकांचे लग्न जुळत नाही. यामुळे पुणे विभागातील मुले २० फेब्रुवारी सोमवारपासून आझाद मैदान येथे उपोषणास बसत आहेत.