शाळेत दिला जाणारा पोषण आहारच त्यांच्यांसाठी बाधक 80 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या माध्यन्ह शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे. ही घटना (दि ९ रोजी ) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. शाळेतील सुमारे ५३ मुलांना ही विषबाधा झाली असून दरम्यान, आहार खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि पोटदुखी इतर त्रास जाणवू लागल्याने शिक्षकांच्या लक्षात आले. त्रास होणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना तातडीनं चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पुणे : विद्यार्थ्यांना शाळेत दिला जाणारा पोषण आहारच त्यांच्यांसाठी बाधक ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे.

सुमारे 80 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे जवळील राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील 80 मुलांना विषबाधा झाली आहे. या प्रकारामुळे पालकही संतप्त झाले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.