क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 5 महिलांची सुटका


पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) फुरसुंगी रोडवरील (Fursungi Road) एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) पडदा पाश केला आहे.या ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या ५ महिलांची सुटका केली आहे. ( News)

याबाबत मारुती महादेव जाधव Maruti Mahadev Jadhav (वय ३०, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मनिषा पुकाळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४४/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी रोडवरील हरपळे वस्ती येथे स्वर्ग लॉज आहे.
या ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजता येथे छापा टाकला.
मारुती जाधव हा तेथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले.
२३ ते ३५ वयोगटातील ५ महिलांना तेथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत. ( News)

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील, पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत,
मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button