ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

सेल्समनने केलं 7 वेळा लग्न; म्हणतो, “माझ्या प्रेमात वेड्या होतात महिला”


एका व्यक्तीला 7 बायका असल्याची घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. त्याला अनेक मुलेही आहेत. 34 वर्षीय नट्टापोंग छबलेम याने यामागचे कारण सांगितले आहे. तो म्हणतो की, त्याच्याकडे प्रेमाशी संबंधित ते विशेष गुण आहेत, ज्यामुळे स्त्रिया त्याच्या प्रेमात वेड्या होतात.तो त्याच्या सर्व बायकांना वेगवेगळ्या प्रकारे भेटला होता, काही मित्रांद्वारे, काही लग्नाच्या कार्यक्रमात, काही फेसबुकवर तर काही इन्स्टाग्रामवर. तो व्यवसायाने सेल्समन आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, नट्टापोंगला एकूण 9 मुले आहेत. तो थायलंडच्या नाखोम पथम प्रांतात आपल्या कुटुंबासह राहतो. त्याला विश्वास आहे की, तो आपल्या सभोवतालच्या सुंदर स्त्रियांसोबत स्वप्नवत जीवन जगत आहे. तो म्हणतो, ‘मी फ्लर्ट करतो आणि मला हे लपवून ठेवणं आवडत नाही. माझ्यात काही गुण आहेत, ज्यामुळे स्त्रिया एकमेकांशी न भांडता माझ्या प्रेमात पडतात. मी वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर सीक्रेटपणे राहू शकत नाही, मी खरे सांगतो. मला खोटं बोलायला आवडत नाही, म्हणून मी सगळ्यांना एका ठिकाणी आणलं.

आपल्या बायकांबद्दल तो म्हणतो, त्या सगळ्या छान वागतात, चांगलं बोलतात, बालिश नाहीत. त्यामुळे मला कशाचीच चिंता नाही. इतर कोणीही पुरुष इतक्या बायका ठेवू शकत नाही. नट्टापाँग म्हणतो, ‘मी सल्ला देतो की जर तुम्ही मॅनेज करू शकत नसाल तर एक पत्नी असणे चांगले.” अनेक बायका असल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button