क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

लिंबागणेश येथे पुन्हा डिझेल चोरीची घटना तर मोरगाव शिवारातील राणुबाई वस्तिवर डिझेल चोरांचा प्रयत्न फसला, सपोनि विलास हजारे घटनास्थळी दाखल


लिंबागणेश येथे पुन्हा डिझेल चोरीची घटना तर मोरगाव शिवारातील राणुबाई वस्तिवर डिझेल चोरांचा प्रयत्न फसला, सपोनि विलास हजारे घटनास्थळी दाखल
___
लिंबागणेश परीसरात डीझेल चोरांचा सुळसुळाट मागील दोन आठवड्या पासून सुरूच असुन आज दि.५ फेब्रु.
मध्यरात्री दिडच्या सुमारास लिंबागणेश येथील गणेश सखाराम वायभट यांच्या गोडाऊन शेजारी उभ्या ट्रक (वाहन क्रमांक एम. एच .१४ ई एम ३४९१ ) मधील डिझेल २५० लिटर अंदाजे किंमत २४ हजार रूपये, तसेच जाॅक, टायर, २ बॅटरीज असा एकूण ६० हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तस दुस-या घटनेत मध्यरात्री २ वा. मोरगाव शिवारातील राणुबाई वस्तीवरील तुळशीराम काटकर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या “गोरे इंग्लिश स्कूल “च्या वाहनातुन डीझेल चोरांनी डिझेल काढले मात्र रात्री २ च्या सुमारास कृष्णा काटकर यांना कुत्र्याच्या भुंकण्यामुळे जाग आली. त्यांनी बाहेर पाहिले असता गाडीजवळ ४-५ जण मोठे कॅन हातात घेऊन ऊभे होते. आरडाओरडा केल्यानंतर कॅन जागीच टाकुन चोरट्यांनी पळ काढला यावेळी एकाची चप्पल सुद्धा त्याठिकाणी तशीच आढळली.
सकाळी पावने बारा वाजता नेकनुर पोलीस स्टेशनचे सपोनि विलास हजारे यांनी घटनास्थळी भेट देत स्थळपंचनामा करून ईतर साहित्य ताब्यात घेतले.डीझेल चोरांचा लिंबागणेश परीसरात सुळसुळाट:- डाॅ.गणेश ढवळे
___
दोन आठवड्यापासून लिंबागणेश परीसरात मोठ्याप्रमाणात डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत, राजयोग धाबा तसेच लिंबागणेश येथील मारोती मंदिरासमोरील ट्रकमधुन शेख अझीम यांचे जवळपास ४० हजार रूपयांचे डिझेल चोरीला गेले तर अन्य लोकांनाही नेकनुर पोलीस यांना डिझेल चोरीबाबत तक्रारी केल्या आहेत. याचोरीमुळे वाहनचालक भयभीत 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button