भारतीय कंपनीच्‍या Eye Drop मुळे अमेरिकन नागरिकांनी गमावली दृष्टी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चेन्नईस्थित भारतीय औषध कंपनीने आपल्या Eye Drop चे उत्पादन सध्या थांबवले आहे. या ड्रॉपच्या वापरामुळे अमेरिकेतील अनेकांची दृष्टी गमावली असल्‍याचा आरोप अमेरिकेतील एका संस्थेकडून करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या कथित दाव्यानंतर, यापूर्वी कंपनीने बाजारातील आपले Eye Drop उत्पादन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आता कंपनीने या औषधाचे उत्पादन देखील बंद केले असल्‍याचे ‘एएनआय’ वृत्तसंस्‍थेने म्‍हटले आहे.

दिल्लीतील एम्स रूग्णालयाच्या नेत्र सर्जन डॉक्टर नम्रता शर्मा आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीने म्हटले आहे की, EzirCare Artificial Tear हे आय ड्रॉप भारतात विकले किंवा वापरले जात नाही. त्यामुळे भारतीयांना घाबरून जाण्याची गरज नाही असे म्हटले आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने चेन्नईतील कंपनीचे उत्पादन बाजारातून निलंबित केले आहे. याचबरोबर उत्तर अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आय ड्रॉपमुळे आणखी ५५ जणांना डोळ्यांचा दाह जाणवत असल्याचे अमेरिकेतील केसेसमधून समोर आले असल्याचे सांगितले आहे.

सूत्रांनी ‘एएनआय’ला दिलेल्या माहितीनुसार, डोळ्यांच्या तक्रारीसंबंधीच्या घटना समोर आल्यानंतर दोन्ही देशातील तपास यंत्रणा सातत्याने याचा तपास करत आहेत. चेन्नईस्थित ग्लोबल फार्मा हेल्थ केअरने उत्पादित केलेल्या EzriCare आर्टिफिशियल टियर्स आय ड्रॉप्सच्या न उघडलेल्या बाटल्यांची चाचणी ते करत आहेत.

कंपनीच्या उत्पादनांची आयात थांबत असल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने सांगितले आहे. या संस्थेने संबंधित आय ड्रॉपचे उत्पादन खरेदी करू नये, यामुळे डोळ्यांच्या संसर्गाबरोबरच अंधत्व आणि मृत्यूही होऊ शकतो, असे अमेरिकास्थित कंपनीने सांगितले आहे.