ताज्या बातम्या

अवैध धंद्यावर त्वरीत आळा बसवा


शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या आरमोरी शहरासह तालुक्यात अवैध धंद्याना ऊत आले आहे. तालुक्यात दारु, सट्टापट्टी व सुगंधीत तंबाखु व्यवसायाने जोम धरला आहे. त्यामुळे सामाजिक वातावरण कलूशित होत असल्याने या अवैध धंद्यावर आळा घालित कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी शहरासह तालतुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. जिल्ह्यात दारुबंदी असतांनाही शहरात विषारी दारुची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. तसेच अवैध सट्टापत्ती व बनावट सुगंधी तंबाखुची विक्री केली जात आहे. यामुळे शहरातील युवक दारुच्या आहारी जात असून अनेकांचे कुटूंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.



तसेच बनावट सुगंधित तंबाखु विक्रीमुळे लहान विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे समाजातील वातावरण दुषित होत असून समाजविघात कृत्येही बळावली आहे. illegal business त्यामुळे या समाज विघातक गोष्टींवर आळा घालण्यासाठी सदर अवैध व्यावसायिकांना अटक करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रंजित बनकर यांच्या नेतृत्वात मनसेच्या पदाधिका-यांनी आरमोरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शिष्टमंडळात आशुतोष गिरडकर, प्रथमेश साळवे, राकेश सोनकुसरे, विभा बोबाटे, ज्योती बघमारे, लिलेश सहारे, गणेश तिजारे, तेजराम चिलबुले, आशा बोळणे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button