पीएमपी-दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : सिंहगड रोडवरील गोऱ्हे ब्रुद्रुक येथील अक्वारिस हॉटेल समोर पीएमपी बस आणि दुचाकीची सामोरा समोर धडक बसून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आदित्य राजेंद्र देशमुख (वय २२, रा.तनिष सृष्टी, आळंदी देवाची) आणि निलेश मल्लेश मित्रे (वय २२, रा. ताडीवाला रोड, पुणे )अशी या अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणाची नावे आहेत.

स्वारगेट कडून खानापूरकडे जाणारी पीएमपीएल बस (एमएच १२ आरएन ९०७१) या बसला दोन तरूण दुचाकी वरून सिंहगडच्या बाजूकडून पुण्याच्या दिशेने येत असताना गोऱ्हे बु. गावच्या हद्दीत हाँटेल कोंढाणा समोर धडक बसली.

गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत खडकवासला धरणाला लागून असलेल्या ॲक्वेरिअस हॉटेलच्या समोर बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही तरुण अत्यवस्थ होऊन पडले होते. त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही तरुणांचे मृतदेह खाजगी रुग्णालयातून उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश कदम अधिक तपास करत आहेत.