भाजप उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ सलीम जहाँगीर यांच्या शाळा , महाविद्यालयांना भेटी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


भाजप उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ सलीम जहाँगीर यांच्या शाळा , महाविद्यालयांना भेटी

प्रा. किरण पाटील यांना पहिल्या पसंतीची मते देण्याचे आवाहन

बीड : मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना ,आर.पी.आय, रासपा युतीचे मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी बीड शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी देवून प्रा. किरण पाटील यांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे असे आवाहन केले.

बीड जिल्ह्यात भाजप नेते सलिम जहाँगीर यांनी मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील मिलिया माध्यमिक उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक , प्राध्यापकांच्या भेटी घेउन प्रा. किरण पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या मतांवर आमदार होणारे सभागृहात गप्प बसतात. काही शब्द बोलत नाहीत. आतापर्यंत सलग 15 वेळा मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या विरोधकांनी शिक्षक हिताचे निर्णय कधीच घेतले नाही. केवळ आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न केले. मात्र आता खरे काम करणारे कोण आहेत हे मतदारांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे यावेळी अशा मतलबी आमदारास वेळीच धडा शिकवण्यासाठी भाजप मित्र पक्षांचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना पहिली पसंत देऊन विजयी करण्याचे आवाहन सलीम जहाँगीर यांनी केले. याप्रसंगी जिल्हा संगठन मंत्री प्रा. देविदास नागरगोजे,अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर, मुसाखान पठाण, नूर लाला खान , लताताई मस्के व कार्यकर्ते उपस्थित होते.