क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा काकाकडून 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार


बुलडाणा : दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अत्याचाराची घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी घडली आहे.



यामध्ये काकानेच आपल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार (Buldhana Minor Girl Rape Case) केले आहेत. या घटनेमुळे परिसरात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. नराधम काकाने आपल्या 15 वर्षीय पुतणीला गाडीवर बसवून बुलडाणा येथे नेले. त्या ठिकाणी त्याने एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. यानंतर पीडित मुलीला त्याने घरी सोडले. घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने त्या नराधम काका विरुद्ध चिखली पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर चिखली पोलिसांनी आरोपी नराधम काकावर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button