क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड अनैतिक संबंधातून दोघांची आत्महत्या


बीड : पिंपळनेर येथे एका महिलेसह पुरुषाने एकाचवेळी आत्महत्या केल्याने 26 जानेवारीला खळबळपोलिसांकडून याबाबत तपास सुरु असतानाच, त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. तर आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात बिनसले होते, यामुळे दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती पुढे आली आहे. मोहन बाबूराव नरवडे (वय 53 वर्षे), कौसाबाई भीमराव जाधव (वय 40 वर्षे, दोघे रा. पिंपळनेर) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, मृत कौसाबाईचे सासर गेवराई तालुक्यात असून माहेर बाभळवाडी (ता. बीड) आहे. दरम्यान त्या पाच वर्षापासून पिंपळनेरमध्ये राहत होत्या. 26 जानेवारीला सकाळी मोहन नरवडे यांनी स्वतःच्या शेतात गोठ्यामध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याच गोठ्याजवळील विहिरीतच कौसाबाई जाधव यांचा देखील मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले होते.

घटनेनंतर मयत कौसाबाईच्या भावाच्या फिर्यादीवरून 27 जानेवारीला मृत मोहन नरवडेवर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. तर कौसाबाईने मोहन नरवडेला 50 हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे कोसाबाई परत मागत होती. मात्र, मोहन पैसे न देता उलट तिला त्रास देत होता, असे कौसाबाईच्या यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button