बीड अनैतिक संबंधातून महिलेने विहिरीत उडी घेतली, तर पुरुषाने गळफास घेवून आपल्या आयुष्याचा केला शेवट..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अनैतिक संबंधातून एका प्रेमीयुगुलाने धक्कादायक पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. बीडमधील पिंपळनेर या ठिकाणी हि धक्कदायक घटना घडली आहे

यामध्ये महिलेने विहिरीत उडी घेतली, तर पुरुषाने गळफास घेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहन बाबूराव नरवडे असे मृत व्यक्तीचे तर कौसाबाई जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पिंपळनेरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

बीड : बीडमधील पिंपळनेरमध्ये एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी अनैतिक संबंधातून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या दोघांनी एकाचवेळी हे पाऊल उचलले आहे. मृत व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर महिलेने विहीरीत उडी घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Beed Crime)

मोहन बाबूराव नरवडे यांचा त्यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
नरवडे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या वेळी त्यांच्या खिशातून पोलिसांनी एक चिठ्ठी जप्त केली.
त्यात काही जणांची नावे आहेत, तर नरवडे यांच्या शर्टावरही काही नावे होती.
त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले होते. दरम्यान, याच चिठ्ठीत कौसा विहिरीत पडली असून तिचा मृत्यू
झाला असेल असेही लिहिलेले होते. त्यानंतर पोलिसांनी नरवडेंच्या शेतातील विहिरीत शोध घेतला असता कौसाबाई जाधव यांचा मृतदेह मिळून आला. दोघांचे अनैतिक संबंध होते.
यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे एपीआय बाळासाहेब आघाव यांनी सांगितले.
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.