आगीत डॉक्टरसह 6 जणांचा मृत्यू, स्वत:ला वाचवण्यासाठी बाथटबमध्ये बसले डॉक्टर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नवी दिल्ली : झारखंडमधील धनबाद येथील एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजता आग लागली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी सर्वजण झोपलेले होते. एका डॉक्टराचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी ते पाण्याच्या टबमध्ये बसले, असे सांगितले जात आहे.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासानंतर ही आग स्टोअर रूममधून लागली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आग लागल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. डॉक्टर खिडकीतून स्वतःला वाचवण्याची विनंती करत आहेत. फायरमन आणि खाली असलेले लोक सांगत आहेत की काळजी करू नका डॉक्टर. आम्ही येत आहोत. आम्ही तुमच्याकडे शिडीने येत आहोत.

पुतण्यासह 6 जणांचा गुदमरून मृत्यू
हॉस्पिटलचे नाव हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे. हे धनबादच्या बँक मोड पोलिस स्टेशन परिसरात टेलिफोन एक्सचेंज रोडवर आहे. डॉक्टर त्यांच्या कुटुंबासह क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. अपघातात डॉक्टर दाम्पत्य, त्यांची मोलकरीण, डॉ. हाजरा यांच्या पुतण्यासह 6 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. सर्व मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमधून बाहेर काढण्यात आले आहेत.