पोटच्या दोन जुळ्या मुलांना विष पाजून बापाने स्‍वत:चे जीवन संपवल्‍याची खळबळजनक घटना

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पोटच्या दोन जुळ्या मुलांनाही विष पाजून स्‍वत:चे बापाने स्‍वत:चे जीवन संपवल्‍याची खळबळजनक घटना जालना येथे घडली. त्या तिघांनाही उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले होते.
उपचार सुरु असताना भागवत पंजाजी काळे (वय ३४) याचा आज (दि. २८) मृत्यू झाला. जुळ्या मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भागवत काळे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. सध्या ते जालना येथे वास्तव्याला होते. आज सकाळी फिरायला जातो, असं सांगून ते घरातून निघाले. मात्र नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर आले. तिथे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले. यानंतर स्वत: विष प्राशन केले. तिघांना उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्‍यात आले. भागवत काळे यांचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. तर भक्ती आणि वेद या मुलांवर उपचार सुरु आहेत.

जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: विष घेतल्‍याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र भागवत काळे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.