क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

चुलत भावानेच केला विवाहित बहिणीवर अत्याचार बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ


चुलत भावानेच आपल्या विवाहित बहिणीवर अत्याचार केल्याची घटना लातुर जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. तूर जिल्ह्यातील उदगीर शहरात ही गंभीर घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.



उदगीर लगत असलेल्या एका उपनगरात राहणाऱ्या आरोपीने त्याच्या पीडित चुलत बहिणीस विटाखाली करण्याचे बहाण्याने सोबत घेवून गेले होते. चांदेगाव पाटीच्या अलीकडे मंदीराच्या पाठीमागील मुरमाच्या खदानी जवळील खड्डयात नेऊन तिच्यासोबत इच्छेविरूध्द जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास मुलाला व आईला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या घटनेनंतर पिडीत महिलेने तिच्या आणि पतीच्या बदनामीला घाबरुन पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र पीडित महिलेच्या आईने व भावाने धीर दिल्यामुळे आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button