70 वर्षाच्या सासऱ्याचा तरुण सूनेवर जीव जडला अन मग ..

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

असं म्हणतात की लग्नगाठ ही वरून ठरवूनच बांधली जाते. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी लग्न केले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच हे अनोखे लग्न चर्चेचा विषय बनला आहे.
सदर घटना गोरखपूर जिल्ह्यात छपिया उमराव गावाच्या बरहलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे छपिया उमराव गावातील रहिवासी कैलाश यादव (70 वर्षे) यांनी आपल्या मुलाची पत्नी पूजा (28 वर्षे) हिच्याशी मंदिरात लग्न केले. एका 70 वर्षांच्या व्यक्तीने 28 वर्षाच्या तरुणी सोबत लग्न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

प्रयागराज : प्रेमाला वयाच बंधन नसतं, असं म्हणतात. कधी, कोण, कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. प्रेमाला वयाच बंधन नसलं, तरी काहीवेळा नात्याची मर्यादा पाळावी लागते. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक विवाह चर्चेचा विषय बनलाय. या लग्नाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलय. सामाजिक बंधनांचा विचार न करता हे लग्न झालय. विवाह करणाऱ्या दोन व्यक्तींच्या वयामध्ये मोठं अंतर आहे. प्रेमाला वयाच बंधन नसतं, असं म्हटलं, तरी एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा पूनर्विवाह असेल, तर चर्चा मात्र होतेच. असच काहीस या विवाहाच्या बाबतीत घडलय. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने स्वत:च्या कुटुंबातील 28 वर्षाच्या सूनसोबत लग्न केलय.

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. हे लग्न चर्चेचा विषय बनलय. जनपदच्या बडहलगंज क्षेत्रातील हे प्रकरण आहे. छपिया उमराव गावातील निवासी कैलास यादव (70 वर्ष) यांनी पूजा (28) सोबत लग्न केलं. पूजा नात्याने त्यांची सून लागायची. गावच्या मंदिरात हे लग्न झालं. या लग्नामुळे अनेकांना धक्का बसलाय. आज तकने हे वृत्त दिलय.

दोघांचे मंदिरातील लग्नाचे फोटो आता व्हायरल झालेत. जनपदच्या बडहलगंज भागात हे लग्न चर्चेचा विषय बनलय. छपिया गावचे कैलाश यादव बडहलगंज ठाण्याचे चौकीदार आहेत. 12 वर्षापूर्वी कैलाश यादव यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

कैलाश यांना चार मुलं आहेत. पूजाच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ती दुसऱ्या कोणासोबत लग्न करुन पुन्हा नव्याने संसार सुरु करणारी होती. पण त्याचवेळी कैलाश यांचा पूजावर जीव जडला. ते पूजाच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी सामाजिक बंधन झुगारली. मंदिरात जाऊन लग्न केलं. दोघांनी परस्पर सहमतीने लग्न केलय. कुठल्याही बाजूने पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.