राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या स्मरणार्थ वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : आरंभ फांऊंडेशन (रजि.) संचलित,अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे छञपती शिवरायांना ज्ञान,चारित्र्य,चातुर्य,संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडु देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या स्मरणार्थ वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन आरंभ फांऊंडेशन चे संस्थापक-अध्यक्ष श्री.ॲड.योगेश दिलीप चांगण,सचिव श्री.दिपक रमेश होळकर तसेच अहिल्या प्रबोधनी मंच तर्फे श्री.नरसिंग होळकर व ॲड.कु.उत्तरेश्वर सो.निंगुळे यांच्यातर्फे करण्यात आले होते विद्यार्थ्यांना आपले मनोगत स्पष्ट,बाणेदार व भाषेवर प्रभुत्व मिळविता यावे तसेच स्वतःतील कलागुणांना वाव मिळावा या भावनेने सदरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत एकुण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यातील प्रथम क्रमांक कु.संस्कृती विजय गव्हाणे,द्वितीय क्रमांक कु.तितिक्षा किशोर तारळकर,तृतीय चि.आमोद दत्तात्रय गव्हाणे यांनी संपादित केला.विजेत्यांना सरपंच श्री.बाळासाहेब गव्हाणे,उपसरपंच श्री.जालिंदर गव्हाणे व श्री.दिपक रमेश होळकर यांच्यातर्फे . घेतले.आरंभ फांऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी मंच त्यांचे मनापासुन आभार मानते.