कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कीर्तनकार ह.भ. प.बंडातात्या कराडकर यांना पॅरेलिसिस म्हणजेच पक्षाघाताचा सौम्य झटका आला असून, त्यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार व तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जे. टी. पोळ यांनी दिली.

ह. भ. प बंडातात्या कराडकर बुधवारी रात्री पिंपरद येथील कार्यालयात मुक्कामासाठी होते. काल (गुरूवार) सकाळी सात वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने फलटण येथील जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले.

त्यांना पॅरेलिसिसचा सौम्य अॅटॅक आला होता. ब्लड प्रेशर व शुगर वाढली होती. डॉक्टर पोळ व त्यांच्या टीमने सर्व तपासण्या करून औषधोपचार केले. काल दिवसभर व रात्री डॉक्टरांच्या देखरेखेखालीच होते.
आज सकाळी मेंदूच्या रक्तवाहिन्यांची तपासणी (डी एस ए) साठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले असून त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार असल्याचे समजते. त्यांची प्रकृती स्थिर आहे.