ऊसाच्या ट्रकचा भीषण अपघात छतासह टॅक्सीचालकाचं शीरही झालं धडावेगळं

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


काळी पिवळी आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यात काळी पिवळीच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काय आहे संपूर्ण घटना – भीषण अपघाताची ही घटना पैठण शहागड रोडवरील आयटीआय जवळ घडली. पैठण-शहागड रोडवर असलेल्या आयटीआयसमोर काळी पिवळी आणि उसाच्या ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात काळी पिवळी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, काळी पिवळी चालकाचे शिर धडावेगळे झाले होते. तर काळी पिवळी वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. नारायण कुंडलिक पांगरे असे अपघातात मृतत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

काळी पिवळी चालक शहागडकडे जात असतांना समोरून येणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रक्टरमध्ये जोरदार धडक जोराची धडक होऊन हा अपघात झाला.