ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

दिल्लीला निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सीमा वादावर निघणार का तोडगा?


वी दिल्ली, 14 डिसेंबर : राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेचा वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी तातडीने दिल्लीला रवाना होणार आहे. या दिल्ली दौऱ्यात कर्नाटक सीमावादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कर्नाटक सरकारने बेळगाव आणि राज्यातील काही गावांवर दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एकापाठोपाठ अनेक विधानं करून वादाला तोंड फोडले होते.



कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचेच सरकार असल्यामुळे विरोधकांना टीकेची संधी मिळाली.(मंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय; आरोपी अन् 11 पोलीस..)विरोधकांनी शिंदे सरकारला कोंडीत पकडले असून थेट जाब विचारला आहे. याच मुद्यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची आमनेसामने बैठक होण्याची शक्यता आहे. (Winter Session : शिंदे सरकारसाठी ‘हे’ पाच मुद्दे ठरणार डोकेदुखी?) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक आज सायंकाळी 7.30 वाजता नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये सीमावादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button