ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पिस्तूलचा धाक दाखवून 35 वर्षीय विवाहितेवर बलात्कार


पिस्तूलचा धाक दाखवून 35 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम शेख असं त्यांच्या मुलाचं नाव आहे.पुणे : दौंड (Daund) शहरात एका विवाहितेबरोबर बळजबरीने लग्न लावल्यानंतर पिस्तूलचा धाक दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याचा मुलगा वसीम शेख याच्यासह एकूण सहा जणांविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
बलात्काराचा व्हिडिओ काढून तो सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडितेचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. (Daund’s former mayor of son raped married woman by putting gungi medicine in the syrup)

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. वसीम बादशहा शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड) याच्या पत्नीने १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पीडित विवाहितेला वसीम व तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घर बोलावले होते. पीडितेला सरबतमधून गुंगीचे द्रव्य दिल्यानंतर बादशहा आदम शेख व त्याच्या कुटुंबीयांनी बळजबरीने वसीम व तिचा मुस्लिम पद्धतीने विवाह लावून दिला. त्यानंतर वसीम याने बलात्कार केला.

पीडितेकडे वसीम शेख याने नवऱ्याला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली. माझ्याशी रितसर निकाह न केल्यास संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. वसीम याला एका प्रकरणात अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने अत्याचार प्रकरणी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार वसीम शेख, बादशहा आदम शेख, माजी नगरसेविका रेहाना बादशहा शेख व त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य, असे एकूण सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी गटनेता असलेला बादशहा शेख व त्याचा मुलगा वसीम बादशहा शेख हे संशयित आरोपी एका विनयभंग, प्राणघातक हल्ला व ॲट्रोसिटी प्रकरणात सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button