महाविद्यालयातील समुपदेशनाच्या कार्यक्रमात मौन सोडल्याने घरातीलच गुन्हेगार समोर

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : अतिशय हुशार असलेल्या आणि सध्या बारावी सायन्समध्ये शिकत असलेल्या १७ वर्षीय मुलीने महाविद्यालयातील समुपदेशनाच्या कार्यक्रमात मौन सोडल्याने घरातीलच गुन्हेगार समोर आले आहेतआपल्यावर सहा वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराची माहिती यावेळी दिली. उत्तर प्रदेशातील मूळ गावाकडे असताना चुलत्याने दमदाटी करून तिच्यावर वर्षभर अत्याचार केला. आजोबांनी वारंवार विनयभंग केला. ही बाब तिने वडिलांना चिठ्ठी लिहून कळविली. मात्र, २०१८ मध्ये पुण्यात आल्यावर वडिलांनीही तिच्यावर चार वर्षे अत्याचार केला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिच्या ४९ वर्षांच्या नराधम बापाला अटक केली आहे. हा प्रकार ऐकून पोलिसही सुन्न झाले. तिच्या आईने याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले.