ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणखी एका वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश


पुणे:हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हरपळे वस्ती येथे चालणाऱ्या एका वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. त्या ठिकाणाहून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या महिलांची सुटका करण्यात आली  तर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मारुती महादेव जाधव, कृष्णा दिनकर जाधव रमेश ढोरे आणि परमेश्वर काळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार रंजना पिसे यांनी तक्रार दिली आहे. हरपळे वस्ती येथील ढोरे पेट्रोल पंपा समोर असणाऱ्या स्वर्ग लॉज मध्ये हा गोरख धंदा सुरू होता. या ठिकाणाहून नवी मुंबई येथील 37 वर्षीय आणि पश्चिम बंगाल येथील 27 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी रस्त्यावर असणाऱ्या एका लॉज मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता दोन महिला आढळून आल्या. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई केली असून अधिक
तपास सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button