शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा रद्द

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा रद्द झाल्या आहेत. आदित्य ठाकरे यांची सभा औरंगाबाद जिल्ह्यात होणार होती.

तर सुषमा अंधारे यांची सभा ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे होती. या दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारेंची सभा होती. तर याचठिकाणी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सभा होती.

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम 144 लागू करत या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही सभा रद्द करत असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे – सरकारकडून मुक्ताईनगरमधील नियोजित सभेवर आकसबुद्धीनं, सत्तेचा गैरवापर करत, दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे वाईट आहे. आमच्या सभेत असंविधानिक काहीही होणार नाही, आम्ही अत्यंत संयत भाषेत फक्त आणि फक्त कायदा काय आहे, महापुरुषांचा विचार काय आहे, संतवचन काय आहे, महाराष्ट्र कशा पद्धतीनं जोडता येईल तसेच महाराष्ट्राच्या समस्या काय आहेत? या संबंधानं फक्त लोकांशी जाऊन बोलत आहोत.ही घटनेची पायमल्ली आहे.
पोलिसांना ग्रामीण भागात सभेमुळे वातावरण बिघडेल असे वाटत असेल तर त्यासाठी पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पण ते त्यांच्याकडून होत नसेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरत आहेत. त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही, अशा शब्दांत अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !