क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

पत्नीच्या प्रेमसंबंधाला कंटाळून हॉटेल मालकाने रेल्वेसमोर उडी मारली..


जयपूर : पत्नीच्या प्रेमसंबंधाला कंटाळून एका हॉटेल मालकाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भीलवाडामध्ये घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेतहॉटेल मालकाने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवला असून, त्यामध्ये पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड धमकी देत असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मशीनी मार्केटमध्ये राहणारा कमल कलवानी (वय ४२) यांनी रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. कमलचा मृतदेह रेल्वे फाटकाजवळ आढळून आला. मोबाइलमुळे त्यांची ओळख पटली. मोबाइलमध्ये एक व्हिडीओ आढळून आला. त्यामध्ये पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे हैराण झाल्याचे सांगितले आहे. यात तो बोलला की, पत्नीचे प्रेमसंबंध सुरू आहे. मी दोघांना रंगेहाथ पकडलं, तर ती म्हणाली की, तू काहीच करू शकत नाही. कायदा महिलांचा आहे. पत्नीचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या घरातील लोक मला धमक्या देत आहेत. तो म्हणाला आमचं 50 लाखांचं इन्कम आहे. आम्ही पोलिसांना पैसे देतो. पत्नी सतत भांडण करते, मारहाण करते. याला वैतागून तो आत्महत्या करत आहे.’

कमलचे त्याच्या पत्नीसोबत आणि तिच्या प्रियकरासोबत वाद झाला होता. त्याने पोलिसात याची तक्रारही दाखल केली होती. कमलचे लग्न 18 वर्षांपूर्वी झाले होतं. त्याना दोन मुली आणि एक मुलगा आहे. कमलच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button