राष्ट्रवादीचे १२ नेते फुटले !

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) १२ नेते फुटले आहेत; त्यांच्या प्रवेशाचा फक्त मुहूर्त बाकी आहे, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी आज केला.
आमदार शहाजी पाटील हे पंढरपुरात बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला.
आमदार पाटील म्हणाले की विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी उद्याच्या नागपूर अधिवेशनानंतर राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडणार आहे, असे जे भाकीत केले आहे. ते विधान अत्यंत विनोदी असे आहे. त्याला कोणताही पुरावा नाही. राज्यातील १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.Only news

गेल्या तीन महिन्यांतील शिंदे-फडणवीस या दोन नेत्यांचा कारभार बघितला तर सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीचे काम करताना दिसत आहेत. त्यांना निधी मिळत असून ते जनतेची कामे आणि प्रश्न सोडविताना ते दिसत आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलणं हे एवढ्यासाठी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नेते फुटले आहेत; फक्त ज्याच्या त्याचा प्रवेशाचा मुहूर्त ठरतोय, असेही शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !