ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

‘एडी-1’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी,वैज्ञानिकांचे अभिनंदन..


महत्त्वाच्या घडामोडीत भारताने आज बुधवारी (AD-1 multi-target) ‘एडी-1’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
एकाचवेळी विविध लक्ष्यांचा अचूक भेद घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राची भारताने केलेली ही पहिलीच चाचणी आहे.



ओडिशाच्या किनारपट्टीवरील (AD-1 multi-target) एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली. त्यासाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण वेपन्स प्रणालीचा वापर करण्यात आला. या चाचणीसाठी समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. त्यांचा या क्षेपणास्त्राने एकामागोमाग वेध घेतला, अशजी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. संरक्षण मंत्री राजनाथसिंह राजनाथसिंह यांनी या यशासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. जगातील अतिशय मोजक्या देशांकडेच ही क्षेपणास्त्र प्रणाली असून, या पंक्तीत आता भारताचा समावेश झाला, असे गौरवोद्गार राजनाथसिंह यांनी काढले.

हे लांब पल्ल्याचे इंटरसेप्टर (AD-1 multi-target) क्षेपणास्त्र असून, जास्त उंचीवरील आणि जमिनीलगत जाणार्‍या लक्ष्याचा सहज पाठलाग करून त्याचा वेध घेऊ शकते. चाचणीच्या काळातील निकषांचे परीक्षण केल्यानंतर ही चाचणी सर्व बाजूंनी यशस्वी झाली असल्याचे दिसून आले. या यशस्वी चाचणीमुळे भारताची संरक्षण सज्जता आणि मारक क्षमता आणखी वाढेल, असा विश्वास राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. डीआरडीओचे अध्यक्ष समिर कामत यांनीही या क्षेपणास्त्र प्रकल्पातील सर्व वैज्ञानिक व अभियंत्यांचे अभिनंदन केले.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button