क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मुलगा लग्नाला होकार देत नसल्याने त्याच्या अंगावर अॅसिड फेकलं


प्रेम प्रकरणांमध्ये आपण पाहिलं असेल की मुलगा त्याला आवडणाऱ्या मुलीला प्रपोज करतो मात्र ती नकार देते. त्यानंतर प्रेमात वेडा झालेला मुलगा काहीतरी चुकीच पाऊल उचलत स्वत:चा नाहीतर संबंधित मुलीचा जीव धोक्यात जाईल असं वर्तन करतो.लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे मात्र यामध्ये एका महिलेने मुलगा होकार देत नसल्याने त्याच्या अंगावर अॅसिड फेकलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
हरियाणातील सोनीपतमध्ये शाम सिंह नावाचा 25 वर्षीय तरूण आई-वडिल नसल्याने विहारमध्ये तो त्याच्या आत्याकडे राहत होता. शाम एका कंपनीत काम करत होता. या दरम्यान त्याची ओळख सोहाना गावातील एका महिलेसोबत होते. महिला शामचा नंबर शोधून काढते त्याच्याशी फोनवर बोलू लागते.

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

एक दिवशी महिला तिच्या आईला घेऊन शामच्या आत्याकडे जाते आणि दोघांच्या लग्नाबद्दल विचारते. शाम आणि त्याच्या घरचे काही दिवसांचा अवधी मागतात. यादरम्यान शामला बाहेरून माहित पडतं की संबंधित महिलेचं लग्न झालेलं असतं त्यामुळे तो लग्नाला नकार देतो. महिला नाराज होते आणि शामला फोन करून त्रास द्यायला सुरूवात करते. कंटाळून शाम तिचा नंबर ब्लॉक करून टाकतो.

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

26 ऑक्टोबरला संध्याकाळी श्याम दूध आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. त्यावेळी संबंधित महिला तिथे येते आणि शामला काही समजण्याआधीच ती अ‍ॅसिडची अख्खी बाटली शामच्या अंगावर फेकते. यामध्ये हात, पाय, तोंड, मान, कंबर या ठिकाणी भाजलं जातं. शाम मोठ्याने ओरडू लागतो सर्वजण बाहेर येतात त्याला रूग्णालयात दाखल करतात. शामच्या आत्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडित शामची प्रकृती गंभीर आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button