स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट ,आठ ते दहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीत अचानक स्फोट झाला. स्फोटाची क्षमता एवढी होती की, ज्यात भट्टी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे आजूबाजूला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर हा वितळलेलं लोखंड पडले. ज्यात ते गंभीर जखमी झाले

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

जालना : जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत मंगळवारी सकाळच्या सुमारास स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले.
यामध्ये आठ ते दहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अनेक कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी १२ वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतल्या स्टील कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीत अचानक स्फोट झाला. स्फोटाची क्षमता एवढी होती की, ज्यात भट्टी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे आजूबाजूला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर हा वितळलेलं लोखंड पडले. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र यातील दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून, आणखी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे.

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते. कंपनी प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या अर्थपूर्ण देवाण-घेवाणीने या प्रकरणावर पडदा टाकला जातो. पोलीस प्रशासन कंपन्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये कामगारांचा नाहक बळी जात असल्याचे दिसून येते. प्रशासन आणखी किती कामगारांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल यानिमित्याने उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने कंपनी मालक व अधिकारी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.