ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

पाऊस कधी जाणार याबाबत महत्त्वाची माहिती..


हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसात पाऊस देशातून हद्दपार होणार असल्याची माहिती दिली असली तरी राज्यातील सध्याची स्थिती अजूनही जैसे थे अशीच आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात पावसाने निरोप घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. तसेच सर्वसामान्यांनादेखील दिवाळीत सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडता येऊ शकेल.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने प्रचंड कहर माजवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने थैमान माजवले आहे
काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला, जनजीवन विस्कळीत झालं. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पाण्याने बळीराजाच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं. पीकं वाहून गेली. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरलं गेलं. हे संकट आणखी किती दिवस राहील? अशी चिंता बळीराजाला सतावत होती. पण सुदैवाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आज समोर आली आहे. हवामान विभागाने आज एक महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला आहे. पुढच्या 48 तासांमध्ये पाऊस फक्त राज्यच नाही तर देशभरातून परत जाणार आहे.

हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी वातावरणातील बदलाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. विदर्भातील अनेक भागांमधून पाऊस आता निरोप घेणार आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे. याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणातील काही भागातून पाऊस जाणार असल्याचीदेखील माहिती होसाळीकर यांनी दिलीय. विशेष म्हणजे होसाळीकर यांनी राज्य आणि देशभरातून पाऊस कधी जाणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासांमध्ये देशभरातील वातावरण कोरडं होणार आहे. त्यामुळे पाऊस आता जाणार आणि हिवाळ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button