एक्स्प्रेससमोर उडी घेऊन अल्पवयीन मुलीसह तरुणाची आत्महत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आत्महत्या केलेल्या दोघांची ओळख पटली असून, दोघेही प्रेमी युगुल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून यातील मुलगी ही फक्त 14 वर्षांची असून युवक 22 वर्षांचा आहे. दोघेही जवळच्या संग्रामपूर तालुक्यातील कवठल परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली…? आत्महत्या की अजून अपघात की घातपात यावर आता पोलीस तपास करत आहेत. शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यात यासंबंधी नोंद करण्यात आली आहे.

धावत्या विदर्भ एक्स्प्रेससमोर (Vidarbha Express) उडी घेऊन एका अल्पवयीन मुलीसह तरुणानं आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon)रेल्वे स्थानकाजवळ शेगाव ते नागझरी दरम्यान ही घटना घडली.

हे दोघेही प्रेमी युगुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाला आहे. घटनेतील मृत तरुण हा संग्रामपूर तालुक्यातील कवठलं या गावचा आहे. अजय संजय मोरखडे (वय 22 वर्ष) असं मृत तरुणाचं नाव असून, त्याची ओळख पटली आहे. तर 14 वर्षीय मृत युवती ही त्याच परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गोंदिया-मुंबई सुपरफास्ट विदर्भ एक्स्प्रेस शेगावकडे येत होती. यावेळीनागझरी ते शेगाव दरम्यान व शेगाव रेल्वे स्थानकापासून जवळ नागरिकांना दोघांचे छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे मार्गावर आढळून आले. त्यानंतर परिसरात एकच खळब उडाली होती. या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, रात्र असल्यानं दोघांची ओळख पटली नाही. मात्र या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.