मेहकरी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी उपळून निघते त्या पाण्यामुळे १०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मेहकरी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी उपळून निघते त्या पाण्यामुळे १०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे झाले नुकसान

मनसेच्या वतीने दिले पाटबंधारे विभागाला निवेदन

आष्टी : मेहकरी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी उपळून निघते त्या पाण्यामुळे १०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे झाले नुकसान मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष जयदिप मिसाळ व सराटेवडगाव ग्रामस्थ यांनी दिले पाटबंधारे विभाग आष्टी यांना निवेदन निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मौजे सराटेवडगाव (आनंदवाडी ) मधील शेतकऱ्यांच्या मेहकरी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी उपळून निघाले त्यामुळे अनेक घरात पाणी उपलळून येत आहे. तसेच शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. तरी या नुकसानीचा पंचनामा त्वरित करून नुकसानग्रस्तांना त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी या संदर्भात त्वरित कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंदोलन आष्टी येथील पाटबंधारे कार्यालयासमोर करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे .निवेदन आष्टी पाटबंधारे विभाग यांना देतांना दिपक उंबरकर ( जिल्हा उपाध्यक्ष मनसे ), कैलास दरेकर ( जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना मनसे ), महेश मुरकुटे शहर अध्यक्ष (मनसे), ओमकार पालकर ( शहराध्यक्ष म.न वि से), योगेश बोराडे,अक्षय पांडुळे ,तुषार घोडेस्वार आदी उपस्थित होते