भूतबाधाच्या नावाखाली महिलेच्या बरगड्या, मान आणि मणक्याचे हाडे तोडली बेदम मारहाण करून निर्घृण हत्या

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बालाघाट येथून हृदय पिळवटून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. भूतबाधाच्या नावाखाली दोन तांत्रिकांनी महिलेच्या शरीराला दातांनी चावा घेत निर्दयीपणे मारहाण केली.
यावेळी महिलेच्या बरगड्या, मान आणि मणक्याचे हाडे तुटले. हृदय आणि फुफ्फुसातही जखमा झाल्या होत्या. दोन्ही तांत्रिकांनी महिलेची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कटंगीपासून सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या चिचगाव कोल्हापूर गावात कुटुंबीयांनी महिलेला झाड-फूक करण्यासाठी तांत्रिकाकडे नेले होते. मृतकाचे पती सुंदरलाल बहेश्वर यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री त्यांची पत्नी गीता यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर आम्ही तिला खजरी गावात तांत्रिकाकडे घेऊन गेलो. तांत्रिक ज्युनियर मात्रे आणि तमलाल बहेश्वर यांनी गीताच्या शरीरात आत्म्याच्या उपस्थितीबद्दल सांगितले. दरम्यान, ते देवाची सवारी असल्याचा दावा करू लागले. यानंतर त्यांनी गीताला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

पतीने सांगितले की, त्याने तांत्रिकाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही. गीता बेशुद्ध होईपर्यंत तो मारहाण करत होता. ती बेशुद्ध पडल्यावर तिला डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले. आम्ही तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महिलेच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी पोहोचून दोन्ही तांत्रिकांना अटक केली. गीताबाई (४० वर्षे) या मृत महिलेचे शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले. कटंगी रुग्णालयाचे बीएमओ डॉ. पंकज महाजन यांनी सांगितले की, शवविच्छेदनात अंतर्गत जखमा आढळून आल्या आहेत.

मारहाणीमुळे महिलेच्या हृदयाला, फुफ्फुसाला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बरगड्या, मान आणि पाठीचा कणाही तुटला. अंतर्गत अवयवांवर दातांच्या खुणा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.