7.1 C
New York
Saturday, December 9, 2023

Buy now

तरूणीची गळफास घेवुन राहत्या घरात आत्महत्या

spot_img

यावल : तालुक्यातील अंजाळे गावातील लग्न घटिकाजवळ आलेल्या तरूणीने आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे.
तरूणीने अचानक आत्महत्याचे पाऊल उचलल्याने गावात शोककळा पसरली असून , याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहीती अशी की , मिनल निवृत्ती भागवत या तरुणीने आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . या बाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अ.मृ .र ६५ / २०२२ प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे. सदरच्या आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळी नंतर होणार होते अशी माहीती मिळत आहे. दरम्यान मयत तरूणीचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश पवन जैन यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles