7.1 C
New York
Saturday, December 9, 2023

Buy now

चीनसह जगातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना आक्रमक

spot_img

चीनसह जगातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढल्याच्या बातम्या येत आहेत. चीन आणि युरोपातील अनेक देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून संसर्ग वाढताना दिसत आहे, यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. चीनच्या शांघाय शहरात वाढलेल्या संसर्गामुळे काही भागांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थितीही निर्माण होत आहे, तर युरोपीय देशांतील शास्त्रज्ञांनी आणखी एक लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा झालेली वाढ चिंताजनक आहे. दरम्यान, शास्त्रज्ञांच्या पथकाने हाँगकाँगमध्ये एक नवीन व्हेरियंट शोधून काढला आहे, ज्याला जागतिक धोका म्हणून पाहिले जात आहे.
दक्षिण चीनमधील मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाँगकाँगमध्ये कोविड-19 XBB चे सब -व्हेरियंट आढळून आले आहे, जे प्राथमिक अभ्यासात लसीद्वारे तयार केलेली प्रतिकारशक्ती सहजतेने चुकवून संसर्ग वाढवणारे आढळले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात या व्हेरियंटमुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे, त्याबाबत प्रत्येकाला विशेष खबरदारी घ्यावी लागेल.

प्राथमिक संशोधनात असे आढळून आले की XBB प्रकार ओमिक्रॉनच्या BA.2.75 आणि BA.2.10 या दोन व्हेरियंटमधील पुनर्संयोजनामुळे निर्माण झाला आहे. सध्या, हे आतापर्यंतच्या सर्व कोरोना व्हेरियंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे आढळून आले आहे. लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.सिंगापूरमध्ये आजकाल दररोज होणाऱ्या संसर्गाच्या अर्ध्याहून अधिक प्रकरणांसाठी हा व्हेरियंट जबाबदार असल्याचे मानले जाते. भारतातील काही राज्यांमध्येही त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

अलीकडील मीडिया अहवालानुसार, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये XBB व्हेरियंटमुळे संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गुरुवारी (13 ऑक्टोबर) महाराष्ट्रात या व्हेरियंटची पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सुमारे दोन आठवड्यांत, या व्हेरियंटमुळे ओडिशामध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 17 आणि तामिळनाडूमध्ये 16 XBB संसर्गाची पुष्टी झाली आहे.

बहुतेक संक्रमितांमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसत आहेत. तापासह घसा खवखवणे ही सर्वात सामान्य समस्या संक्रमित लोकांमध्ये दिसून येते. तज्ञांचे म्हणणे आहे की आतापर्यंत असे कोणतेही पुरावे नाहीत की यामुळे गंभीर संक्रमण होत आहे. काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते परंतु ते सहज बरे होत आहेत. मात्र, आतापर्यंत याबाबत अधिक माहिती मिळाली नाही

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles