ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला – बाबा रामदेव


योगगुरू बाबा रामदेव त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. नुकतेच बाबा रामदेव मुरादाबाद येथे पार पडलेल्या आर्यवीर महासंमेलनाच्या व्यासपीठावरून लोकांना अंमली पदार्थांपासून मुक्त होण्याचे आवाहन करताना दिसले. दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात बॉलिवूड स्टार्सवरही जोरदार टीका केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर त्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी अनेक बड्या कलाकारांचं नाव घेत टीकास्त्र सोडलं आहे.‘सलमान (Salman Khan) ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल (Aamir Khan) मला माहित नाही. तर, देवच बॉलिवूड अभिनेत्रींचा मालक आहे’, असं वक्तव्य त्यांनी या मंचावरून केलं. बाबा रामदेव म्हणाले की, शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला, त्यासाठी तो तुरुंगात गेला. सलमान खानही ड्रग्ज घेतो. आमिर खान ड्रग्ज घेतो की, नाही हे मला माहीत नाही. संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे.

बाबा रामदेव यांनी पुढे सांगितले की ‘एक निश्चय आपणही केला पाहिजे की, संपूर्ण भारत भूमी ही ऋषीमुनींची भूमी आपण पूर्णपणे नशामुक्त केली पाहिजे. त्याची समाजाला गरज आहे. यामुळे लहान मुलं आणि विद्यार्थी यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.’ त्यामुळे आजच विडी, सिगारेट, दारू सोडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बाबा रामदेव म्हणाले की, मी कुंभमध्ये चिलीम सोडण्याची मोहीम सुरू केली होती. साधूंना असे आवाहन केले की, तुम्हाला सर्व काही मिळेल. पण, ही चिलीम सोडा. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर शेकडो साधूंनी त्यांची चिलीम रामदेव बाबा यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या आणि म्हटले होते की, बाबाजी आजपासून आम्ही चिलीम ओढणार नाही.’


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button