बीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड आतिषबाजीने आसमंत उजळला, रावणाचे दहन केले


आतिषबाजीने आसमंत उजळला, रावणाचे दहन केले. बीड शहरातील खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात संध्याकाळी रावणालाचे दहन करण्यात आले. यावेळी आतिषबाजीने आसमंत उजळून नीघाला. या सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती

बीड : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी दसरा हा एक सण आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी रावण दहन आणि शस्त्र पूजा केली जाते. बीडमध्ये देखील रावण दहनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी तब्बल 40 फूट उंचीच्या महाकाय रावणाचे दहन करण्यात आले  खंडेश्वरी मंदिर बीड वासियांचे ग्रामदैवत आहे. या मंदिर परिसरात शारदीय नवरात्र महोत्सव सीमोल्लंघन सपन्न झाले

सायंकाळी तब्बल 40 फूट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. रावण बनवण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला होता. यामध्ये मंदिराचे माता सेवक, मंदिर सदस्यांनी मेहनत घेऊन उत्सवाची तयारी केली . सजवण्यासाठी 100 मीटर कपडा रावण बनवण्यासाठी प्रामुख्याने कसपण, पालापाचोळा, सरमठाचा वापर करण्यात आला आहे.

रावण तयार करण्यासाठी जवळपास 80 हजार रुपये इतका खर्च आला आहे. दहनावेळी आकर्षक असे फटाके आतिषबाजीची व्यवस्था देखील करण्यात आली होती त्यासाठी 70 हजारांचा खर्च आला आहे. लोखंडी अँगलचा बेस देत रावण तयार करण्यात आला आहे. या मोठ्या रावणाचे वजन जवळपास एक टन होते.

मुखवटे फायबरचे असून रावणाला सजवण्यासाठी 100 मीटर कपडा लागला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button