माजी कर्णधार संदीप लामिछाने याला काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक,17 वर्षीय मुलीवर बलात्कार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
आता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

लामिछाने यांनी याआधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते, मात्र नंतर त्यांनी आत्मसमर्पण करण्याचे मान्य केले. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर संदीप नेपाळ सोडले होते पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यानंतर आपण आत्मसमर्पण करण्यास तयार असून 6 ऑक्टोबर रोजी देशात परतणार असल्याचे त्याने सांगितले.
आपल्या स्पष्टीकरणात लामिछाने यांनी फेसबुकवर लिहिले आहे, “मी मोठ्या आशेने आणि ताकदीने पुष्टी करतो की मी या 6 ऑक्टोबर 2022 रोजी नेपाळला पोहोचत आहे. खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी नेपाळचा नागरिक म्हणून घोषित करतो. मी अधिकार्‍यांना सुपूर्द करीन. मी निर्दोष आहे आणि न्याय व्यवस्थेवर माझा अढळ विश्वास आहे याचा मी पुनरुच्चार करतो. माझा सर्व कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आहे. मला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा आहे.
नेपाळ पोलिसांनी घेतली इंटरपोलची मदत

संदीपचा ठावठिकाणा न लागल्यामुळे नेपाळ पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली होती. नेपाळ पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने विरुद्ध ‘डिफ्यूजन’ नोटीस जारी केली. १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेपाळच्या न्यायालयाने ८ सप्टेंबर रोजी लामिछानेच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले होते.